अहमदनगर

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचे संगमनेर शहरात जोरदार स्वागत

संगमनेर शहर : स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे रविवार, दि. 10 डिसेंबर 2023 रोजी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असता त्यांचे हिवरगाव टोल नाका ते संगमनेर शहरापर्यंत चार चाकी गाड्यांची रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ ढोल, ताशा पथक व फटाक्यांच्या आतिषबाजी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपलं राज्य, जय स्वराज्य घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

छत्रपती संभाजीराजे यांनी सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास भेट देत प्रस्तावित अश्वारूढ छत्रपती स्मारक जागेची पाहणी करत स्मारकासाठी शासन दरबारी येणाऱ्या अडचणींमध्ये वैयक्तिक लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी लवकरच आपण पेमगिरी शहगडावर पुन्हा येणार असून किल्ल्याच्या विकासा संदर्भात आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले. प्रत्येक मावळ्याच्या पाठीशी स्वराज्य पक्ष खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही प्रदेश सरचिटणीस डॉ धनंजय जाधव यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.आशिष कानवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश पवार यांनी केले.

सदर दौरा यशस्वी करण्यासाठी विनोद कोकणे, रोहित यादव, ओंकार डोंगरे, जय दुशिंग, आदित्य बढे, राहुल कानवडे, सचिन कानवडे, साईनाथ बोराटे, दत्ता लहामंगे, वैशालीताई खरात, माधुरीताई देशमुख, ओंकार अभंग, ओंकार जोर्वेकर, आकाश टिपरे, तोफिक शेख, भाविक गायकवाड, मुकेश नरवडे, कायदेशीर सल्लागार विशाल जाधव, सुरेश कालडा, योगेश सूर्यवंशी, अमित पवार, विनायक गरुडकर यांच्यासह विद्यार्थी संघटनेने विशेष परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button