राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ९ हजार रुपये अधिक महागाई भत्ता देण्याचे जाहीर करु – खा सुप्रिया सुळे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : केंद्र सरकारने निर्णय न घेतल्यास येणाऱ्या लोकसभा २०२४ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ९ हजार रुपये अधिक महागाई भत्ता असा पेन्शन वाढीचा उल्लेख राहील, असे खा. सुप्रिया सुळे यांनी १२ डिसेंबर रोजी नवी दिल्ली जंतर मंतर येथे झालेल्या देशव्यापी आक्रोश आंदोलन प्रसंगी जाहीर केले.
या मेळाव्यात प्रकाश येंडे, प्रकाश पाठक, बाबुराव दळवी, पुंडलिक पांडे, भीमराव डोंगरे, सर्जेराव दहिफळे, सुभाष कुलकर्णी यांची भाषणे झाली. मेळाव्यात अनेक संघटनांचे दहा हजार पेन्शन धारक सहभागी झाले होते. केंद्र सरकारने पेन्शन वाढ आदी प्रश्नांचा निर्णय न झाल्यास सत्ताधारी पक्षाच्या विरोधात २०२४ मध्ये मतदान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूर गेली १२ वर्षे लढा देत आहे तरी पेन्शनवाढ करण्यात आली नाही.
२०१२ या वर्षी खा.भगतसिंह कोशियारी यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने ३ हजार रुपये पेन्शन वाढ करावी अशी शिफारस केली. परंतु केंद्र सरकारने २०१४ या वर्षी १ हजार रुपये मंजूर करण्यात आले. ही पेन्शन अत्यल्प असून दैनंदिन गरजा भागविता येत नाही. दि २० एप्रिल २३ रोजी व २९ ऑगस्ट रोजी लोकसभा सेक्रेटेरी एट पार्लमेंट हाउस दिल्ली अडीशनल डायरेक्टर यांनी पेन्शन धारकांच्या मागणीसाठी पेन्शन संघटना व ट्रेड युनियन संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ३ हजार रुपयांची शिफारस आज अंमलात आणली असती तर आज पेन्शन ८ ते ९ हजार रुपये पेन्शन दरमहा मिळाली असती. त्यासाठी १२ वर्षे आंदोलने केली पण पदरात काही आले नाही.
पंतप्रधान यांनी अनेक घोषणा केल्या व शेतकरी, कामगार आदींना भरघोस अनुदान देण्याच्या घोषणा केल्या. पण लाखो रुपये जमा करणाऱ्या पेन्शन धारकांना दरमहा ८०० ते १५०० पर्यंत पेन्शन दिली जाते. मेळाव्यास अध्यक्ष एस एल दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, उपाध्यक्ष बाबुराव दळवी, अंकुशराव पवार, भागिनाथ काळे, विठ्ठलराव पावसे, विलास दसपुते, हरिभाऊ खाटिक आदींसह मोठ्या संख्येने पेन्शन धारक उपस्थित होते.