अहमदनगर

राहुरी खुर्द च्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी निसारभाई शेख

पत्रकार अशोक मंडलिक व पत्रकार रमेश खेमनर यांची सदस्यपदी निवड

राहुरी : तालुक्यातील राहुरी खुर्द येथील तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची निवड नुकतीच पार पडली. या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राहुरी खुर्द चे मा. उपसरपंच निसारभाई ईमाम शेख यांची तर पत्रकार अशोक मंडलिक व पत्रकार रमेश खेमनर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

राहुरी खुर्द गावचे सरपंच सौ. मालतीताई साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत निवडी करण्यात आल्या. यावेळी उपसरपंच तुकाराम बाचकर, ज्येष्ठ नेते गेणूभाऊ तोडमल, मा, सरपंच ईमामभाई शेख, नंदकुमार डोळस, मधुकर साळवे, आयुबभाई पठाण, रफीकभाई शेख, उमेश बाचकर, आण्णासाहेब बाचकर, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण यावेळी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button