ठळक बातम्या

कधीतरी शेतकऱ्यांचाही विचार करा, निःशुल्क तेल आयात थांबवा

पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंतांकडे क्रांतीसेनेची मागणी

कळंब : शासनाने मध्यंतरी तेलाच्या स्थिर किमंतीसाठी सोयातेल आयात शुल्कात कपात केली. हे सरकारचे धोरण सोयाबीन दर वृद्धीस मारक ठरले. यामुळे अशी धोरण रद्द करत उपभोक्त्याचा जसा विचार केला जातो, तसाच विचार कधीतरी शेतकऱ्यांचाही करण्याची मागणी मंगळवारी पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंतांकडे अखिल भारतीय क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शेळके यांनी केली.

सदर निवेदनात म्हटले आहे की, केंद्रशासनाने महागाई कमी करण्यासाठी सोयाबीन व अन्य तेलांच्या आयात शुल्कात सूट दिली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या कडील सोयाबीन कमी भावात विकावा लागत आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचे तर कंबरडे मोडले आहे. तो मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आपण केंद्र शासनास विनंती करून सोयाबीन व अन्य तेलांच्या आयात शुल्कात सूट देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा ही सरकारला दिला आहे.

या निवेदनावर संदीप शेंडगे, विजयकुमार गायकवाड, रामेश्वर बोधले, शरद मुळीक, रोशन कोमटवार, संजय कदम, शकील शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button