राजकीय

शिरसगाव ग्रामपंचायत निवडणूक जवळ, इच्छुकांची लगबग सुरु…

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आल्याने विखे, मुरकुटे, आदिक गटाचे कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली व अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा संपली.

आता ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा गट, अविनाश आदिक यांचा गट, माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा गट अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. गावच्या विकासाच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोणता पक्ष कोणाशी युती करतो व दुहेरी लढत कशी होईल हे पण पाहण्याचे गरजेचे आहे.

सध्या माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची सत्ता आहे. तिहेरी लढतीचा सत्ता संघर्ष कदाचित होण्याचे सध्यातरी चित्र आहे. अनेक इच्छुकांनी तयारी सुरु केल्याने ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होणार आहे. ना.राधाकृष्ण विखे पा. गटाचे नेतृत्व गणेशराव मुदगुले, युवा नेते अविनाश आदिक गटाचे नेतृत्व किशोर पाटील तर माजी आ.भानुदास मुरकुटे गटाचे नेतृत्व आबासाहेब गवारे हे करणार आहेत.

सध्या प्रशासक राज असल्याने अनेक अडचणी येत होत्या. मुदत संपल्याने अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. निवडणूक लांबणीवर पडतच होती. मागील आठवड्यात मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून अनेकांचा जीव भांड्यात पडला. शिरसगाव ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा प्रभाग असून प्रभाग १ मध्ये १००८, प्रभाग दोनमध्ये ७२५, प्रभाग ३ मध्ये १०३७, प्रभाग ४ मध्ये ८६७, प्रभाग ५ मध्ये ११९०, प्रभाग ६ मध्ये १२०९ असे एकूण ६००६ चे आसपास मतदार आहेत.

प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण स्त्री अथवा पुरुष १, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १, प्रभाग २ साठी सर्वसाधारण स्त्री किंवा पुरुष १, नागरिक मागास प्रवर्ग स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, वार्ड ३-अनु.जाती स्त्री किंवा पुरुष १, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष १, वार्ड क्र ४- अनुसूचित जातीसाठी स्त्री किंवा पुरुष १, सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष १, सर्वसाधारण स्त्री १, वार्ड क्र ५- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष १, अनु.जाती स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, प्रभाग ६ – सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री किंवा पुरुष १, अनु.जाती स्त्री १, अनु.जमाती स्त्री १, अशा एकूण १७ ग्रा.प.सदस्य व सरपंच पदासाठी एक अशा १८ जागा निवडून द्यायचे आहेत.

श्रीरामपूर शहरालगत शिरसगाव ग्रामपंचायत असल्याने तालुक्यात राजकीय दृष्ट्या फार महत्वाची आहे. त्यात थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने ते पद महिला अनुसूचित जातीसाठी आहे. त्यामुळे चुरशीची निवडणूक होईल असा अंदाज दिसतो. महिलेस पद असल्याने इच्छुक उमेदवारांची नाराजी व अपेक्षा भंग झाला आहे. तिहेरी लढत झाल्यास त्याचा फायदा कोणाला होईल हे आता सांगणे अवघड आहे. तसेच मतदार यादीत बाहेर स्थलांतर झालेले नागरिक यांनी आपले नाव स्वत:हून कमी करण्यात यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल असे नागरिक चर्चा करीत आहेत. ज्यांना निवडणुकी संबंधात काही हरकती असल्यास २१ ऑगस्टपर्यंत नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button