आरोग्य

हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा लाभ घ्यावा – देवेंद्र लांबे

कृतीतून सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्याचे सिद्ध केले

राहुरी – शहरात ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत नसल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे. परंतु आता आपला दवाखाना सुरु झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न सुटणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी ‘हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा’ लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी आज राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधत ‘हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे’ शुभारंभ प्रसंगी केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १ मे २३ रोजी राज्यातील गोरगरीब जनतेचा आरोग्य प्रश्न सुटावा, म्हणून ‘हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हि योजना कार्यान्वित केली आहे. या दवाखान्यात सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणी, औषधे, रक्ताच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख जयवंत पवार, शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, आरडगावचे मा.सरपंच कर्णा जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आली.

पुढे बोलताना देवेंद्र लांबे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे कृतीशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना केंद्र बिंदू मानून विविध योजना राबविण्यात येत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शासकीय कामे केली जात आहेत. शासनाने जाहीर केलेल्या योजनाचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळावा म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने शिवदूत काम करीत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी आपला दवाखाना विषयी माहिती देतांना डॉ.नम्रता मुकणे म्हणाल्या की, या दवाखान्यात सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपला दवाखाना येथे मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे व सर्व प्रकारच्या रक्त, लघवी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. हा दवाखाना दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन सर्वसामान्य नागरिक रामभाऊ गुंजाळ यांच्या हस्ते करून शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी शिवसेना- भाजपचे ‘शिंदे- फडणवीस सरकार’ हे सर्वसामान्य जनतेचे असल्याचे या कृतीतून दाखवून दिल्याने त्यांच्या या कृतीमुळे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

या कार्यक्रमास अशोक तनपुरे, प्रशांत खळेकर, महेंद्र उगले, महेंद्र शेळके, रोहित नालकर, नानासाहेब काचोळे, मिलिंद हरिश्चंद्रे, राजेंद्र लबडे, सतीष घुले, अनिल पेरणे, ज्ञानेश्वर सप्रे, वसंत कदम, दत्तात्रय अडसुरे, दादासाहेब खाडे, अंकुश पवार, बाळासाहेब कदम, अशोक तुपे, बापूसाहेब काळे, आरोग्य विभागाचे डॉ.मधुलक्ष्मी बेरड, संदीप कल्हापुरे, किरण शिंदे, हर्शल झांबरे, गौरव जाधव, प्रसाद तांबे, देशमुख, घनशाम कळसाइत, राहुल कोतकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पंचायत समितीचे आरोग्यदूत किरण खेसमाळस्कर यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button