सामाजिक
धनराज गाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
स्व. शिवाजीराजे गाडे पाटील मित्र परिवाराकडून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
राहुरी | अशोक मंडलिक : अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उद्या मंगळवार दि. 27 जुन 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मंगल कार्यालय बारागाव नांदुर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे, आमदार निलेश लंके, माजी आमदार भानुदास मुरकुटे, पै.रावसाहेब खेवरे, युवा नेते राजूभाऊ शेटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी राहुरी तालुक्यातील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्व.शिवाजीराजे गाडे पाटील मित्र परिवार, शेतकरी मंडळ राहुरी तालुका व धनराज शिवाजीराव गाडे युवा प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.