आरोग्य

निरामय जीवनासाठी योग व प्राणायामावर आधारीत भारतीय जीवनशैली सर्वोत्तम- माजी कुलगुरु डॉ. एन.सी. गौतम

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

राहुरी | जावेद शेख : विद्यार्थी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग व प्राणायामाचा अंगीकार केल्यास त्यांचे शारिरीक व मानसीक आरोग्य उत्तम राहुन त्यांच्या एकाग्रतेत तसेच बौध्दीक क्षमतेत वाढ होते. आपली प्राचीन भारतीय जीवनशैली ही योग व प्राणायामावर आधारीत असून ती सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन मध्यप्रदेशातील सटना, चित्रकूट येथील महात्मा गांधी चित्रकुट ग्रामोदया विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. एन.सी. गौतम यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमीक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या पीयर रीव्ह्यु टीमचे अध्यक्ष डॉ. एन.सी. गौमत मार्गदर्शन करतांना बोलत हाते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने, सावित्रिबाई फुले माध्यमिक व उच्चमाध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, प्राथमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापीका श्रीमती योगीता आठरे उपस्थित होते.

योगशिक्षक रविंद्र आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीनी कु. पुजा लिंभोरे, कु. सायली बिरादार, कु. प्रज्ञा आंधळे व कु. शिवानी शिंदे यांनी संस्थेच्या तीनही विद्यालयातील इयत्ता 4 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रकारे योग व प्राणायाम प्रात्यक्षिके करुन घेतले. डॉ. महानंद माने यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. जितेंद्र मेटकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच सावित्रिबाई फुले प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमीक, माध्यमीक विद्यालयाचे प्राध्यापक तसेच सर्व शिक्षक, क्रीडाशिक्षक घनशाम सानप, एन.सी.सी. अधिकारी संतोष जाधव यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button