आरोग्य

हरेगाव -उंदिरगाव परिसरात आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे काम सुरु

श्रीरामपुर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उंदिरगाव यांच्या माध्यमातुन हरेगाव -उंदिरगाव परिसरातील ठिकठिकाणी नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्याची सुविधा सुरू केली असुन नागरिकांनी आरोग्य कार्ड काढुन घ्यावे असे आवाहान आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल राजगुरू यांनी केले आहे.

भारत सरकारच्या आयुष्यमान भारत अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत दवाखान्याचा खर्च मोफत केला जातो. या कामी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कय्युम देशमुख, अजित गायकवाड , अविनाश पंडित, संदिप माने, गिरीश जाधव, राजेंद्र बिरंगल, रामदास दळवी, आरोग्य सेविका सविता उजागरे, आशा वर्कर मंगल परदेशी, शर्मिला शेख, माया पंडित आदी कार्यरत आहेत. तरी नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रमार्फत आपले आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे असे आवाहन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button