साहित्य व संस्कृती

“आपला माणूस आपल्यासाठी” या पुस्तकाचे प्रकाशन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या जीवनावर साहित्यिक पुंडलिक गवंडी यांनी लिहिलेले “आपला माणूस आपल्यासाठी” ह्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबई येथे उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचा स्वागत समारंभ दि. 4 जानेवारी रोजी शिर्डी येथे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी लोकसभा मतदार संघातले भाऊसाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या समवेत करण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांनी लेखक पुंडलिक गवंडी यांच्या साहित्याचा थोडक्यात परामर्श घेतला. त्यांच्या ‘हातोडा’ या आत्मचरित्राचा महाराष्ट्रात झालेला बोलबाला त्यांनी विशद केला. तसेच त्यांच्या इतर 30 साहित्यकृतींचाही आढावा घेण्यात आला. याप्रसंगी पुंडलिक गवंडी यांचा सत्कार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आला. आपला माणूस आपल्यासाठी या पुस्तकाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

2024 च्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी तथा भावी लोकप्रतिनिधी म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांचे कार्य मोलाचे ठरले आहे. माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांचा शिर्डी लोकसभा मतदार संघातील लोकसंग्रह आणि त्यांची लोकप्रियता पाहता 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे, असा कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button