अहमदनगर

संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी गणेशराव मुदगुले यांची नियुक्ती

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथील गणेशराव मुदगुले यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना अंतर्गत योजनाचे कार्य समितीमार्फत करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या श्रीरामपूर अध्यक्षपदी अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी गणेशराव मुदगुले यांनी सांगितले की, मार्गदर्शक ना.राधाकृष्ण विखे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्यास सार्थ राहून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. सर्व निराधारांंना आधार देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यातील सर्व नागरिकांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचविणार व लाभ देण्याचा प्रयत्न करील. यावेळी मुदगुले यांच्या हस्ते ना. विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष दीपकअण्णा पटारे, शरद नवले, नानासाहेब शिंदे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, केदार यादव, मनोज रासकर आदी उपस्थित होते. गणेशराव मुदगुले यांच्या निवडीबद्दल अशोकराव पवार, बापूसाहेब काळे, सुरेशराव ताके, नितीन गवारे, निलेश यादव, अण्णा ताके, ग्रामसेवक पी डी दर्शने, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव व सर्व ग्रा.प.सदस्य, कर्मचारी, पत्रकार बी आर चेडे आदींसह शिरसगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button