अहमदनगर

सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्काराने जावेद शेख सन्मानीत

दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेने पत्रकारांना पुरस्कार देऊन पत्रकार दिन केला साजरा

राहुरी : दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यात पत्रकारितेत उत्तम कामगिरी बद्दल सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्काराने तालुक्यातील पत्रकार जावेद शेख यांना सन्मानीत करण्यात आले.

‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्था, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांच्या वतीने पत्रकारितेत उत्तम कामगिरी करणारे सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्कार सन २०२३-२४ अहमदनगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कै.दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समिती, शेतकरी भवन, अ.नगर येथे संपन्न झाला.

याप्रसंगी तहसीलदार संजय शिंदे, एम.आ.डी.सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेमदान, कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बार असोसिएशनचे उपअध्यक्ष ॲड. महेश शेडाळे, संजय वायकर आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी दै.साईसंध्या व दै.पुणे वैभव तसेच दै.हिंदू सम्राटचे राहुरी तालुका प्रतिनिधी अभ्यासू, सजग, लोकशाहीचा चौथा स्तंभाच्या माध्यमातून आपली भूमिका सडेतोड मांडून शेवटच्या घटकाला आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी कायम धडपडणारे पत्रकार जावेद शेख यांना पत्रकारितेत, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यात  पत्रकारितेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्कार सन २०२३-२४ करीता सन्मानित करण्यात आले.

दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे, उपाध्यक्ष शारदा मुंगसे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळपुंड, नाना भोरडे, गौरी भोस, ऐश्वर्या पवार, सुनिता भाकरे, रेखा नवसे, मिरा पडळकर, मच्छिंद्र ढाकणे, प्रतीक ठोंबे, तुषार धावडे, अभिषेक चौघुले, अल्तमश शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सबिल सय्यद यांनी केले तर शहादेव मुंगसे यांनी आभार व्यक्त केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button