अहमदनगर

जनतेने लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करावा – खा. विखे पाटील

राहुरी | अशोक मंडलिक : ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते, आ. मोनिकाताई राजळे, आ.राम शिंदे आणि अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या विशेष सहकार्याचे कौतुक करून जिल्ह्यातील दाळ, साखर वाटपाबाबत २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यासाठी ज्यांना अयोध्येत येता येणार नाही त्यांनी आपल्या गावातच दाळीचे लाडू वाटून हा सोहळा साजरा करावा असे आवाहन अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करून “पत्रकार दिन“ साजरा केला, त्यावेळी बोलत होते. गेल्या पाच वर्षांत केलेल्या “कोटींच्या कोटी उड्डाणे” विकास कामांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील पत्रकारांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. पुढील ३ महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत लिखाण करण्याची पर्वणी असल्याने पत्रकारांनी आपली लेखणी चांगल्या पद्धतीने चालवून योग्य दिशेने वाटचाल करावी, असेही यावेळी बोलताना सांगितले.

माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून पत्रकारांचा सन्मान करण्याची विखे घराण्याची जी परंपरा आहे. ती आम्ही जोपासत आहोत असे सांगून गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यात पत्रकारांचा सिंहांचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात भारतीय जनता पक्ष देईल ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली जाईल असे आश्वासन खा. विखे पाटील यांनी दिले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुलाखालून अजून बरेच पाणी वाहून जाणार असल्याने त्या विषयावर बोलण्याचे त्यांनी टाळले. जिल्ह्यातील एकूण सहाशे पत्रकार यावेळी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button