क्रीडा

केंद्र स्तरीय विविध गुणदर्शन, सांस्कृतिक स्पर्धेत नेत्रदीपक यश

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे येथे केंद्र स्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले.

त्यात हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गट मंथन चितळकर प्रथम, बालगट- हर्षदा शहाजी वडीतके प्रथम, वकृत्व स्पर्धा- किलबिल गट संस्कृती घाडगे झाड्गे प्रथम, बालगट- आदित्य चितळकर प्रथम, वेशभूषा सादरीकरण स्पर्धा- किलबिल गट- अनिकेत वडीतके प्रथम, बालगट स्वरांजली कंगे प्रथम, वैयक्तिक गीत गायन स्पर्धा- किलबिल गट- संस्कृती झाडगे प्रथम, बालगट- हर्षदा शहाजी वडीतके व्दितीय क्रमांक पटकाविला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे यशाबद्दल सरपंच सविता वडीतके, अण्णासाहेब गेठे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष संपत चितळकर, अंकुश वडीतके, उपसरपंच जांभूळकर, गोविंद तांबे, निखील वडीतके, पुष्पलता चितळकर, चेतन वडीतके, भाऊसाहेब चितळकर, मुख्याध्यापक भांगरे, शिक्षक कंगे, व ग्रामस्थ मांडवे यांनी अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button