क्रीडा

प्रा. सूर्यवंशी उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित

राहुरी : कॉ.पी.बी.कडू पाटील फाउंडेशन आणि रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक सन 2023 -24 अंतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्काराने राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक प्रा. पी. पी. सुर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले.

नेत्र विशेषज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पाटोदा गावचे मा. सरपंच भास्करराव पेरे पाटील, मा. आमदार पांडुरंग अभंग, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ज्युनिअर कॉलेजचे प्रा. राजेंद्र बडे, विभागप्रमुख प्रा.विलास दिघे, पंकज दिघे, प्रा.सतिश कदम, प्रा.आण्णासाहेब गोर्डे, प्रा.किशोर दातीर, प्रा.विश्वास घुगे, प्रा.शिंदे, प्रा. देवरे, प्रा. शेख, प्रा.हापसे, प्रा हिंगे, प्रा.कंक्राळे, प्रा शेळके, जालिंदर बनगये व सर्व प्राध्यापक, बंधू व भगिनींनी शुभेच्छा व अभिनंदन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button