धार्मिक

शिरसगाव येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त भव्य कलश मिरवणूक

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अयोध्यात होणाऱ्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतभर प्रभू श्रीराममय वातावरण दि २१ व २२ जानेवारी रोजी होत असल्याने शिरसगाव येथेही रविवारी सायंकाळी ५ ते ७ वाजता फटाक्यांची आतिषबाजी करीत सवाद्य भव्य कलश मिरवणूक गावातून काढण्यात आली.

या मिरवणुकीत शिरसगावातील सर्व पुरुष, महिला, बालके मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर कलश घेतले होते. विठ्ठल मंदिरात दिपोत्सव साजरा झाला. त्याचप्रमाणे सोमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या आनंदमय सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गणेशराव मुदगुले, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, सर्व ग्रा .प. सदस्य, शिरसगाव ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button