रयत शैक्षणिक संकुल सात्रळच्या विद्यार्थ्यांची क्रिकेट क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी
राहुरी : पोखरा, नेपाळ येथे झालेल्या इंडो-नेपाळ युथ गेम्स इंटरनॅशनल सिरीज 2023 च्या क्रिकेट खेळात पोखरा रंगशाला स्टेडियमवर रयत शैक्षणिक संकुल माध्यमिक व ज्युनियर विभाग सात्रळच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेचे व सात्रळचे नाव इतिहासाच्या पटलावर कोरले.
अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा इयत्ता ११ वी चा विद्यार्थी चि. सिनारे कृष्णा प्रकाश याने १७ वर्षाच्या वयोगटात क्रिकेट या खेळात उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले. पुढे होणाऱ्या असियन युथ गेम्स इंटरनॅशनल सिरीज 2024 ठिकाण थायलंड यासाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा.पी.पी. सुर्यंवंशी, प्रा.विलास दिघे, जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशिनकर, केशव मुसमाडे, युनुस पठाण, सचिदानंद झावरे, भारत कोहकडे, संजय दिघे, प्रकाश कुलथे, विलास गभाले, ज्ञानदेव लेंडे, वैभव वसावे, सतिश नालकर, शिवदास सातपुते, देविदास थोरात, जालिंदर बनगये, प्रमिला पंडोरे, संगिता सांगळे, सुनिता ढोकणे, गिताजंली गोसावी, प्रांजली फरकाडे, प्रा.अर्चना बनसोडे, पल्लवी गावडे, प्रविणाताई दिघे, कावेरी वदक, पंकज दिघे, प्रा.सतिश कदम, प्रा.आण्णासाहेब गोर्डे, प्रा.किशोर दातीर, प्रा.विश्वास घुगे, सुदर्शन गिते, रत्नाकर सोनवणे, साबळे मामा, माळी मामा, आदिंचे मार्गदर्शन लाभले.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, सहाय्यक अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, शिवाजी तापकीर, ॲड विजयराव कडू पाटील, बबनराव कडू, संभाजीराव चोरमुंगे, भास्करराव फणसे, पत्रकार किशोर भांड, के.के.बोरा, शांतीभाऊ गांधी, युवानेते किरण कडू, पंकज कडू, विक्रांत कडू, गणेश कडू, प्राचार्य आर.बी. बडे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात, भाऊसाहेब पेटकर, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक आणि शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले.