शिरसगावला सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करणार- गणेशराव मुदगुले
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे रस्त्यातील झाडपाल्याची अतिक्रमणे काढून रस्ते रहदारीस मोकळे केले. गावातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची सर्वत्र व्यवस्था केली. अशा प्रकारे विविध विकास कामे हाती घेत आहोत. ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी आमचे सहकारी बांधव यांचेवर विश्वास दाखवून यश मिळविले. गावात सर्व सुविधा देण्यात येतील. असे प्रतिपादन गणेशराव मुदगुले यांनी खा.सदाशिव लोखंडे यांचे विशेष प्रयत्नातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रु १० लाख खर्चाच्या शिरसगाव येथील मागासवर्गीय स्मशानभूमी अंतर्गत रस्ता पेव्हिंग ब्लॉक करण्याच्या शुभारंभ प्रसंगी केले.
यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला. स्मशान भूमीत जाण्यासाठी दोन रस्ते होणार आहेत. महिन्यापासून सत्ता हातात आल्यावर संपूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली. हिंदूंची स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली. आता मागासवर्गीय स्मशान भूमीत रस्ते काम सुरु असून सुशोभिकरण होईल. परिसरात वृक्षारोपण करण्यात येईल. याआधी स्मशान भूमीची, गावातील रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती होती. उर्वरित कामे हाती घेण्यात येतील.
यावेळी अशोकराव पवार, बापूसाहेब काळे, सुरेशराव ताके, सरपंच राणी संदीप वाघमारे, उपसरपंच संजय यादव, नितीन गवारे, सनी बिलवरे, शेख, जावेद पठाण, अनिल बढे, गणेश वाघ, अमोल जाधव, भास्कर यादव, निलेश यादव, अशोक गवारे, इक्बाल कुरेशी, इक्बाल शेख, युसुफ शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.