आरोग्य

हरेगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथे उद्या  दि. २१ जानेवारी रोजी ग्रामपंचायत हरेगाव व युनिटी आय हॉस्पिटल श्रीरामपूर यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत बाजारतळ, ग्रामपंचायत हरेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनील शिणगारे यांनी दिली.

या शिबिरात मोतीबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चक्कर येणे, डोळ्यात पडदे येणे, धुरकट दिसणे, डोळ्यात लाली असणे, लासूर, डोळ्यात टिक असणे, काच बिंदू, डोळ्यामधील तिरळेपणाची तपासणी आदी विकारांवर मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ निलम अग्रवाल, एमएस ह्या तपासणी करणार आहेत. फेको मशिनव्दारे शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. या शिबिराचा हरेगाव ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भारत गिडवानी, डॉ. निशिकांत चव्हाण, नामदेव जगताप, सुनील शिणगारे, सरपंच दिलीप त्रिभुवन आदींनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button