शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषि विद्यापीठ परिसरात पक्षी गणना

राहुरी | जावेद शेख : सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.महानंद माने यांच्या प्रेरणेतून विद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी म्हणून कृषी विद्यापीठातील 6 किलोमीटर चौरस परिसरात 42 विद्यार्थिनी, 46 विद्यार्थी व 7 अध्यापक अशा 95 पक्षी प्रेमींनी 13 गटातून ही गणना केली. पक्षी गणनेत या वर्षी 4171 पक्षी आढळून आले. यासाठी विद्यापीठातील 13 ठिकाणांची निवड करण्यात आली. दरवर्षी जानेवारी महिन्यात ही गणना त्याच ठिकाणी करण्यात येते. हे पक्षी गणनेचे सलग 10 वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांना निसर्ग पक्षी, प्राणी यांची जवळीक निर्माण व्हावी या हेतुने पक्षी गणना मोहीम राबविली जाते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शालेय परिसर, धरमाडी टेकडी, शेडगे वस्ती, धन्वंतरी विभाग, सडे रोड, उद्यान विद्या विभाग, पाट पूर्व व पाट पश्चिम, भिंगारदे वस्ती इत्यादी तेरा ठिकाणी 8-9 हरित सेनेच्या सदस्य व शिक्षक यांनी गटागटाने हे काम उत्साहात केले. तत्पुर्वी प्रत्येक गटप्रमुखाकडे महाराष्ट्रात आठळणा-या पक्षांचे नावे व फोटो असलेला कागद व नावांचा चार्ट देण्यात आला. तसेच मोबाईल मध्ये महाराष्ट्रात आढळणा-या पक्षांचे फोटो महितीसह विद्यार्थ्यांना देण्यात आली. हातात पॅड, पेन्सिल, पक्षांचे फोटो घेऊन भल्या सकाळी आनंदात निसर्गाच्या सान्निध्यात सर्व टिमने कार्य पार पडले.

पक्षांची आगळीवेगळी दुनिया पाहून मुले मुली भारवून गेली. सर्वांचे आकर्षण होते. अहमदनगर जिल्ह्याचा मानकरी ठरलेला खंड्या पक्षी. मुळा कालव्याच्या दोन्ही घडीला बसून हा सकाळी आपले भक्ष शोधतांना अनेकांना दिसला. विशेष म्हणजे मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी खंड्या पक्षांची संख्या वाढलेली दिसली. अनेकांनी मोरांचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये टिपले. विद्यापीठ परिसरातील फळबागा, पाणी व शिकारीला बंदी यामुळे कृषि विद्यापीठ हे पक्षांकरिता पक्षी अभयारण्य ठरतं आहे. बगळे, कावळे, चिमण्या, कोतवाल, चिरक, बुलबुल, भारव्दाज, पोपट, साळंकी, तुतवार, इत्यादी पक्षी गुण्यागोविंदाने येथे वास्तव्यास आहे.

धरमाडी टेकडी परिसर हा पोपट, मोर, कोतवाल, बुलबुल यांचे आश्रयस्थान आहे. शालेय परिसरात कडूलिंबाची झाडे, पाणी आणि विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणानंतर पक्षांना मिळणारे भोजन ही पक्षांना मेजवानीच असते. परिणामी येथेही चिमणी, साळुंकी, कावळे यांचा निवास जास्त दिसला. सलग तीन चार वर्षी झालेला चांगला पाऊस, आलेली रब्बी पिके यामुळे पक्षांच्या संख्येत वाढ होत आहे.

पक्षी गणनेच्या मोहिमेत गट प्रमुख म्हणून गायत्री कुसमुडे, ओम माळी, अमोदनी गायकवाड, श्रावणी पानसंबळ, भक्ती उंडे, सई शिंदे, श्रावणी शेटे, यश गाडे, युवराज मोरे, ओम जगदाळे, प्रथमेश ठाकूर, जय पवार, समर्थ मंचरे, पिपुष धसाळ, भक्ती ढोकणे, सई भोरे, शिवांजली ढोकणे, चित्रा क्षीरसागर, अंजली गु़ंड, अंकिता बेल्हेकर, अलिशा पठाण, गायत्री वाणी यांनी गट प्रमुख म्हणून कार्य केले तर संतोष जाधव, घनश्याम राजदेव, ऋषिकेश दातीर, गोरक्षनाथ उचाळे, तुकाराम जाधव, हरित सेना सचिव, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे,

मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री, पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा.जितेंद्र मेटकर यांनी विशेष सहकार्य केले. संस्थचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, सभापती डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, संचालक देवेंद्र वंजारी, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

  • गणनेतील वैशिष्टये
  • 2024 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात आढळले 4171 पक्षी.
  • यावर्षी मागील वर्षापेक्षा 1013 पक्षी जादा. मात्र घार, घुबड होला यांच्या संख्येत घट.
  • मोराच्या संख्येत मागील वर्षाच्या संख्येत 33 ने वाढ होऊन 88 मोर आढळले.
  • चिमणी, कावळा, कोकिळ, पोपट, तुतवार, साळुंकी, बुलबुल इ. वाढ संख्येत वाढ.
  • अहमदनगर जिल्ह्याचा मानाचा पक्षी खंड्याच्या संख्येत 26 ने वाढ होवून 55 झाली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button