अहमदनगर

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सत्कार

राहुरी : येथील पोलीस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा राहुरी तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, जिल्हा निमंत्रक राजेंद्र म्हसे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, तालुका सचिव रमेश जाधव, प्रसिद्धी प्रमुख मधुकर म्हसे, संघटक जावेद शेख, सह संघटक रमेश खेमनर, सदस्य उमेश बाचकर, प्रमोद डफळ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना अनेक वेठबिगार कामगारांची सुटका केली होती, तसेच गुन्हेगारांवर वचक बसवत गुन्हेगारीला आळा घालण्यात त्यांना यश आले होते. त्याच पद्धतीने राहुरी तालुक्यात पदभार घेताच त्यांनी सराईत गुन्हेगारांना गावठी कट्टा, जिवंत काडतूस व गांजा विक्री करणार्या दोघे जणांना शीताफिने ताब्यात घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. तसेच शांतताप्रिय असलेल्या राहुरी तालुक्यात अनेक कारणामुळे अशांतता झाल्यामुळे तालुका पूर्वीसारखा शांतताप्रिय करण्याचे आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button