साहित्य व संस्कृती

मातापिता हेच खरे आपल्या जीवनातील दैवत होय – डॉ. राजीव शिंदे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : कुटुंब संस्थेतील जिव्हाळा असेल तर माणसाला समाधान मिळते, कुटुंबातील मातापिता हेच खरे आपल्या जीवनातील दैवत मानले पाहिजे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. राजीव रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

येथील महादेव मळा येथे वाचन संस्कृती प्रतिष्ठान तर्फे ‘मातृपितृ देवोभव’ ही व इतर पुस्तके देऊन श्रीमती शशिकलाताई शिंदे यांचा सन्मान करून पुस्तक परिसंवाद करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. राजीव शिंदे बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘मातृपितृ देवोभव’ ह्या पुस्तकाचे महत्व सांगून प्रास्ताविक केले. यावेळी ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके, स्वाध्याय परिवाराचे माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, कु. रश्मी राजीव शिंदे आदी उपस्थित होते. या सर्वांनी वाचन संस्कृतीची गरज सांगितली.

आई, वडिलांना घरात सन्मान लाभला पाहिजे, कारण त्यांच्या सुखात आणि आनंदप्रेमातच घराचे घरपण टिकून राहते, असे प्राचार्य डॉ. गागरे यांनी मत व्यक्त केले. आई, वडिलांचे अनुभवविश्व समजून घेतले पाहिजे ज्या घरात जेष्ठांचा आदर केला जातो, ते घर सर्वांना आदर्शमय ठरते, असे मत प्राचार्य शेळके यांनी व्यक्त केले. सुखदेव सुकळे यांनी पुस्तकात लिहिलेल्या लेखनाबद्दल माहिती दिली. श्रीमती शशिकलाताई शिंदे यांनी समाधानी जीवन व कुटुंब प्रेम हे ‘मातृपितृ देवोभव’ चे सूत्र महत्वाचे मानले. कु. रश्मी शिंदे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button