सामाजिक

दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचा अनोखा उपक्रम

राहुरी – दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमांतर्गत राहुरी फॅक्टरी येथील विजय साळुंके यांच्याकडुन दिव्यांग महिला भगिनीस व्हीलचेअर भेट देण्यात आली.

राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोनगाव साञळ येथील प्रहार सैनिक दिव्यांग भगिनी कु.मनीषाताई चोथे यांना व्हीलचेअर भेट देण्यात आली. त्या दोन्ही पायाने दिव्यांग आहेत. त्या रांगत चालत असल्याने त्यांना खूप आवश्यकता होती. व्हीलचेअरचा उपयोग चांगल्या प्रकारे होणार आहे.

दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने केलेला उपक्रम पाहुन चोथे कटुंबाने समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे एकाच चोथे कुटुंबात पाच दिव्यांग आहे. हे सर्व ऐकून आम्हाला वाईट वाटले या कुटुंबासाठी संस्थेच्या वतीने त्यांच्या अडचणी सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल, असे प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी सांगितले.

रवींद्र भुजाडी यांचा अनोखा वाढदिवस करण्यात आला. त्यांना साहेबांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच दिव्यांगांचे साहित्य उदाहरणार्थ टॉयलेट खुर्ची, व्हील चेअर, तीन चाकी सायकल, वाकर, चष्मा, कानाचे मशीन आदी ज्यांच्याकडे असेल त्यांनी दिव्यांग सेवा संस्थेस द्यावे. ते साहित्य गरजू दिव्यांगांना देण्यात येणार आहे असे आवाहन संघटनेचे उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख यांनी केले.

यावेळी राहुरी महिला तालुकाध्यक्षा सौ.छायाताई हारदे, जालिंदर हारदे, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, महिला शहराध्यक्षा अनामीका हरेल, राहुरी शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले, अल्ताफ शेख, स्वप्निल चोथे, कु.राधीका चोथे आदि उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button