प्रा.अमोल सावंत यांना पीएचडी प्रदान
लोणी : लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील प्रा.अमोल रमेश सावंत यांना भगवंत विद्यापीठ, अजमेर येथून जैवतंत्रज्ञान या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.अमोल सावंत यांनी “कॉनसिक्वेन्स ऑफ सेलेक्टेड बाँटनिकल ऑन ऍफीड अँड सायटोलॉजिकल इफेक्ट ऑफ सिन्थेटिक इंसेक्टिसाइड ऑन ओनियन रूट टीप सेल” या विषयावर संशोधन करून भगवंत विद्यापीठ, अजमेर येथे शोध निबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधनिबंध मान्य करत प्रा.सावंत यांस पीएचडी पदवी प्रदान केली. प्रा. सावंत यांना जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ.भनवर लाल जाट यांचे प्रमुख मार्गदर्शक तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, लोणी येथील वनस्पतीविद्या येथील विभाग प्रमुख डॉ.अनिल वाबळे यांचे सहाय्यक मार्गदर्शक म्हणून विशेष योगदान लाभले.
सध्या प्रा.सावंत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील वनस्पती शास्त्र या विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. प्रा.अमोल सावंत यांनी आपले पदवी शिक्षण कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे तर पदव्युत्तर शिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी, संभाजीनगर येथे पूर्ण केले. त्यांच्या यशासाठी कुटुंबातील आई, वडील, बहीण, भाऊ तसेच मित्र परिवार व सर्व सदस्यांचा त्यांच्या यशात मोलाचा वाटा आहे या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रा.सावंत यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जि. प. माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी, डॉ.किरण गोंटे तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.