धार्मिक

पुणतांबा येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

पुणतांबा : येथील धम्मांजली बुद्धविहार येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी बुद्धवंदना घेऊन खीरदान आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी धम्म्पुजा श्रामणेर श्री खंडीझोड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘चला बाबासाहेबांना समजून घेऊ या’ या विषयावर प्रसिद्ध लेखक व्याख्याते प्रा. संजय गायकवाड यांचे व्याख्यान झाले.

त्यावेळी चांगदेव परिसरातील सरपंच डॉ.धनवटे, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, विजयराव धनवटे, बाळासाहेब भोरकडे, संगीता भोरकडे, भाऊसाहेब केरे, किशोर कदम, संजय पगारे, बबनराव थोरात, वसंतराव धनवटे, भास्कर हरेर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी धम्मांजली बुद्धविहार कमिटी अध्यक्ष वाल्मिक अंभोरे, बलं बोर्डे, अशोक जोहरे, चक्रधर सोनावणे, राजेश शिर्साठी, सुरेश जमधडे, काशिनाथ गडवे, राजू बोर्डे, अनिल साबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्र संचालन चक्रधर सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश शिरसाठ यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button