महाराष्ट्र

राष्ट्रीय परिसंवादामध्ये डॉ. सचिन सदाफळ यांना उत्कृष्ट शोध निबंध सादरीकरणाचा पुरस्कार प्रदान

राहुरी विद्यापीठ : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशनद्वारे शेतकर्यांचे जीवनमान उंचविणे व अन्नसुरक्षेसाठी हवामान अध्यायवात शेती – कृषी विस्ताराचे धोरण व दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिसंवादामध्ये डॉ. सचिन सदाफळ यांनी सादर केलेल्या शोधनिबंधास उत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे यांच्या हस्ते देण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण तथा परिसंवादाचे आयोजक सचिव डॉ. प्रमोद सावंत, संस्थेचे सचिव डॉ. नितीन कोष्टी, संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. गजानन सावंत, माजी संचालक विस्तार शिक्षण डॉ. अशोक निर्माण आदी मान्यवर उपस्थित होते. या परिसंवादासाठी राज्यातून आलेल्या शास्त्रज्ञांनी शोधनिबंधाचे व पोस्टरचे सादरीकरण केले.

डॉ. सदाफळ यांच्या या यशाबद्दल विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी अभिनंदन केले असून विद्यापीठ स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे. या परिसंवादामध्ये राज्यातून व राज्य बाहेरून 200 कृषी शास्त्रज्ञांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button