धार्मिक

२५ एप्रिल पासून उंदिरगाव येथे अखंड हरीनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदीरगाव येथे २५ एप्रिल पासून २ मे पर्यंत अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव उंदिरगाव हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्री ९ वाजता रोज कीर्तन होणार आहे.

दि २५ एप्रिल रोजी ह.भ.प हरीशरणगिरी महाराज यांचे कीर्तन, दि २६ एप्रिल रोजी ह.भ.प साध्वी सोनालीदीदी करपे, दि २७ एप्रिल रोजी ह.भ.प मुक्ताई महाराज चाळक / ह.भ.प शिवानीताई महाराज चाळक, दि २८ एप्रिल रोजी हा.भ.प शिवाजी महाराज बावस्कर, दि २९ एप्रिल रोजी ह.भ.प सोपान महाराज सानप[शास्त्री], दि ३० एप्रिल रोजी ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, १ मे रोजी ह.भ.प रामायणाचार्य भारतीताई गाडेकर, व मंगळवार दि. २ मे रोजी सायंकाळी ४ वाजता गुरुवारी महंत स्वामी रामगिरी महाराज यांची भव्य रथयात्रा मिरवणूक, काल्याचे कीर्तन, व महाप्रसाद होईल. यावेळी व्यासपीठ चालक ह.भ.प माउली महाराज गुंजाळ, व सहकारी राहतील.

या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, उंदिरगाव, सूर्योदय ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था उंदिरगाव आदींनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button