अहमदनगर

स्वराज्य संघटनेचे कानवडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

संगमनेर शहर : १७ एप्रिल रोजी स्वराज्य संघटनेचे निमंत्रक आशिष कानवडे यांचा वाढदिवस पेमगिरी येथे उत्साहात पार पडला. यावेळी संगमनेर भाजपा तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, मा जि प सदस्य जनार्धन आहेर पाटील, छावा संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश सातपुते, धांदरफळ खु. चे सरपंच संदिप ठोंबरे, सावरचोळ सरपंच अनिता कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सतिष कानवडे यांनी आशिष कानवडे यांचे विशेष नेतृत्वगुण व संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामांचे कौतूक केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जनार्धन पा.आहेर व अविनाश सातपुते यांनी देखील आशिष यांच्याबद्दल येणाऱ्या काळात आश्वासक युवा चेहरा म्हणून पाहिले जाईल असे सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला पेमगिरी, सावरचोळ, नांदुरी, निमगाव येथुन मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. आभार व्यक्त करताना आशिष कानवडे यांना जमलेला समुदाय व प्रेम पाहून भाऊक होऊन अश्रू अनावर झाले. आयोजक संकेत कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहागड युवा प्रतिष्ठान पेमगिरी व ग्रामस्थ लालाभाऊ कानवडे, संदिप राऊत, सागर कानवडे, प्रवीण कडलग, सतिष गोपाळे, अनिकेत गोपाळे यांनी विशेष प्रयत्न केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button