राजकीय

राहुरी तालुक्यातील सहकारी संस्था देशोधडीला लावण्याच काम विरोधक करत आहे-सभापती तनपुरे

राहुरी | अशोक मंडलिक : तनपुरे सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी कारखाना कर्जाच्या खाईत लोटला आहे. त्यामुळे विरोधकांना राहुरी तालुक्यातील सहकारी संस्थेचे काही देणे घेणे नसल्याने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदान करावे, असे आवाहन अरूण तनपुरे यांनी मतदारांना केले आहे.

तालुक्यातील राहुरी बाजार समिती निवडणूकीच्या पाश्वभूमीवर राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिराच्या प्रांगणात ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे संचालक व काही प्रमुख कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी आपण केलेल्या मागील कामाचा एक लेखा जोखा मांडून एक आर्दश मार्केट कमेटी चालवत असल्याचे सांगितले.

यावेळी मा. उपनगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, ज्येष्ठ नागरिक गेणभाऊ तोडमल, मा. सरपंच ईमामभाई शेख, दत्ता कवाणे, आण्णासाहेब बाचकर, अशोक तोडमल, राहुकाका तनपुरे, दिपक तनपुरे, रावसाहेब तोडमल, भास्करराव तोडमल, मा. सरपंच मधुकर साळवे, पं. स. उपसभापती प्रदीप पवार, गंगाराम शेडगे, ग्रा. पं. सदस्य पोपट चोपडे, अश्विनीताई कुमावत, असफ पठाण, आयुबभाई पठाण, पुंजा आघाव, दिपक शेडगे, रफिकभाई शेख, मनोज फोकसे, शिवाजी पवार, डॉ अनिल कदम, सुदाम माळी, मुंकुद शेडगे, मुकिंदा शिंदे, वसीम शेख अदिंसह गामस्थ उपस्थित होते. 

स्व. निर्मलाताई मालपाणी यांचे चिरंजीव पप्पूशेठ मालपणी हे राहुरी खुर्द जनसेवा मंडाळाचे अध्यक्ष झाल्यापासून जनसेवा मंडाळात एक नव चैतन्य निर्माण झाले आहे. येथील आम्ही सर्व कार्यकर्ते तनपुरे यांच्या पाठीशी उभे राहू अशी एक प्रकारे ग्वाही दिली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button