अहमदनगर

महात्मा फुलेंचे कार्य आजही प्रेरणादायी – विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे

राहुरी विद्यापीठ : फुले दांपत्यांनी केलेले कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठात प्रशासकीय इमारतीत महात्मा फुलेंच्या 196 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात डॉ. नरुटे बोलत होते. पुढे बोलताना डॉ. नरूटे म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व जनसामान्यांपर्यंत आपल्या कृतीतून पोहचविल्यामुळे समाज खर्या अर्थाने शिक्षीत झाला. त्यातुनच त्यांचा आर्थिक स्तर उंचावला व जगण्याचे बळ त्यांच्या अंगी आले. ज्योतीबा फुले व त्यांच्या अर्धांगीनी सावित्रीबाई फुले या उभयतांनी वाईट चालीरिती व रुढी परंपरा मोडीत काढण्यासाठी आपले सारे आयुष्य खर्ची घातले.

याप्रसंगी कुलसचिव प्रमोद लहाळे, उपकुलसचिव (विद्या) तथा नियंत्रक विजय पाटील व अधिदान व लेखा अधिकारी सुर्यकांत शेजवळ उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिष्ठाता कार्यालयाचे सहाय्यक कुलसचिव एकनाथ बांगर यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button