अहमदनगर

यात्रेपूर्वी भाविकांच्या सुविधेसाठी सहकार्य करणार – अशोकराव कानडे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ईस्टर सणाच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्याचे नेते माजी नगरसेवक अशोकराव कानडे यांनी हरेगाव संत तेरेजा चर्च येथे येऊन सर्व ख्रिस्ती बांधवाना लोकप्रिय आमदार लहू कानडे यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या व त्याप्रसंगी पॅरिस प्रीस्ट व त्यांच्या सर्व सहकारी यांच्या चर्च परिसरातील काही अडचणी जाणून घेतल्या.

या पुढील काळात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच उत्तम मेषपाळ चर्च उंदीरगाव येथे भेट दिली. त्या ठिकाणी ही सर्व चर्च कमिटीच्या सहकार्याने व आमदार यांच्या वतीने सुशोभिकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी फा. डॉमानिक, फा. रिचड, फा. जेम्स थोरात यांनी अशोकराव कानडे यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला.

त्यांच्या समवेत आलेल्या काँग्रेस पक्षाचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, हरेगाव ग्रा.प. सदस्य सुनिल शिनगारे, आशिष शिंदे आदी सर्व मान्यवरांचा सत्कार व सन्मान केला. यावेळी उंदिरगावचे सरपंच सुभाष बोधक, डी. एस. गायकवाड, अशोक पारखे, बी. सी. मंडलिक, सुरेश बनसोडे, सी एम गायकवाड, राठोड, सुभाष पंडित, दिलीप कोल्हे आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button