साहित्य व संस्कृती

मराठी भाषाशुद्धीचे पहिले प्रवर्तक हे छत्रपती शिवराय असून या भाषेची प्रतिष्ठा ती शिवरायांची पूजा होय – डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मराठी भाषा, संस्कृती, माणूस, प्रदेश आणि सामर्थ्य समजून घेणे ही मायमराठीची सेवा होय, या भाषेत व्यवहार करणे, तिच्या बोलीत व्यक्त होणे, तिचाच वापर शिक्षणाबरोबर सर्व कामकाजात होणे ही मराठी भाषेची प्रतिष्ठा आहे, महाराष्ट्रदैवत असणारे छत्रपती शिवराय हे मराठी भाषाशुद्धीचे पहिले जाणते प्रवर्तक असून, त्यांचा आदर्श प्रत्येक महाराष्ट्रप्रेमींनी उक्तीकृतीने जपावा हीच खरी त्यांची पूजा होय असे मत जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील लोककला, कलावंत, साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मराठी भाषादिनानिमित्त कविसंमेलन, मराठी भाषा व्याख्यान आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे होते. छत्रपती संभाजी महाराजनगरचे प्रा.डॉ. अंबादास सगट हे प्रमुख पाहुणे होते. कविसंमेलन अध्यक्ष मा. सभापती प्रा.सुनीताताई गायकवाड होत्या.
प्रतिमा पूजन झाल्यानंतर संयोजक कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. कवी राजेंद्र थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बहुउद्देशीय समाज संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोंडगे, अरुण राठोड, बाबासाहेब पवार यांनी पाहुण्यांचा सत्कार केले. पाहुण्यांच्या हस्ते अनेक सेवाभावी मान्यवरांना पुरस्कारस्वरूप सन्मान चिन्ह, शाल, पुस्तके, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले. त्यामध्ये समाजभूषण पुरस्कार विजयराव नगरकर, रघुनाथ उघडे, संजय दळवी, पत्रकारभूषण पुरस्कार शौकतभाई शेख, कलाभूषण पुरस्कार जयेश खरे, इसाक मास्टर शेख, उत्कृष्ठ निवेदक भूषण पुरस्कार संजय वैरागर, धर्मरक्षक पुरस्कार दत्ताभाऊ खेमनार, शिक्षणभूषण पुरस्कार एकनाथ आव्हाड, नारीभूषण पुरस्कार सरलाताई कामे इत्यादींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेे.
यावेळी बाभुळगाव गन्गा येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे स्वामी नारायणनंदगिरी महाराज, राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, कवयित्री संगीता फासाटे, कोपरगावचे ॲड. कडू पाटील, सरलाताई कामे, कवी आनंदा साळवे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कवी प्रा.पोपटराव पटारे, लेविन भोसले, रज्जाक शेखसर, भास्कर लगड, महेश कुलकर्णी आदिंनी मनोगत व कविता सादर केल्या. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. अंबादास सगट यांनी मराठी भाषेची थोरवी विविध नोंदीतून स्पष्ट करीत मराठी जागतिक गुणवत्तेची भाषा असून तिच्या विविध बोलीचे सामर्थ्य वाढवले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणातून प्रकाश कुलथे यांनी पत्रकार आणि साहित्यिक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांनी समाजाचे प्रामाणिकपणे प्रबोधन करावे असे सांगून संयोजक कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांच्या कार्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. कु. सुहानी पवार, कु. प्रियंका पवार, आशिष पवार यांनी नियोजन केले. वि. का. सोसायटी चेअरमन अनिल पवार, अशोकचे सा.कारखाना संचालक रामभाऊ कसार, मुख्याध्यापक संदीप कसार आदिंनी सहकार्य केले. सूत्रसंचालन बाबासाहेब पवार, राजेंद्र थोरात यांनी करून आभार मानले.

Related Articles

Back to top button