साहित्य व संस्कृती

‘शब्दगंध’ महिला दिनानिमित्त महिलांचे भावविश्वावर कवितांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध करणार

राहुरी | बाळकृष्ण भोसले : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे भावविश्व उलगडविणाऱ्या कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी महिलांनी आपल्या स्वलिखित कविता पाठवाव्यात असे आवाहन शब्दगंधच्या राज्य संघटक शर्मिला गोसावी यांनी केले आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या स्वलिखित अप्रकाशित दोन कविता, परिचय, पासपोर्ट फोटो, पोस्टाची रुपये पाच ची पाच तिकिटे यासह दिनांक १० फेब्रुवारी पर्यंत शब्दगंध –  फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, भिस्त बाग महाला जवळ, सावेडी अहमदनगर ४१४०३ मो. क्र.९९२१००९७५०  येथे पाठवावे. प्रातिनिधीक काव्यसंग्रहासाठी निवडलेल्या कवितांना स्वतंत्रपणे निर्णय कळविला जाईल. संमती नंतरच कविता प्रसिद्ध केली जाईल. एका खास काव्य संमेलनात प्रकाशन समारंभ होणार असून यावेळी सहभागी कवयित्रींना पाच पुस्तकांचा संच भेट देण्यात येईल.  शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने यासाठी महिलांचे संपादकीय मंडळ निवडण्यात आलले असून यामध्ये ऐश्वर्याताई सातभाई, कोपरगाव, माधुरी चौधरी, औरंगाबाद, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, श्रीरामपूर, स्वाती ठूबे ,पारनेर, जयश्री झरेकर इंगळे, मनिषा गायकवाड, राहुरी, अर्चना भगत, दर्यापूर, सविता शिंदे, मोर्शी, विद्या भडके, संगीता दारकुंडे, शेवगाव, वंदना चिकटे, कोपरगाव यांचा समावेश करण्यात आला आहे.
तरी जास्तीत जास्त महिला कवियत्रींनी आपल्या कविता पाठवाव्यात असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, भगवान राऊत, प्रा. डॉ. अशोक कानडे, सुभाष सोनवणे, अजयकुमार पवार, राजेंद्र फंड, भारत गाडेकर, सुनीलकुमार धस, किशोर डोंगरे, बबनराव गिरी, प्रा तुकाराम गोंदकर, प्रा. डॉ. संजय दवंगे, प्रा.डॉ. किशोर धनवडे, हरिभाऊ नजन यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button