महाराष्ट्र

आयकर विभागात कार्यरत असलेले गिते यांचा आगळावेगळा सेवापुर्ती सोहळा

आयकर विभागात कार्यरत असलेले गिते यांचा वृक्षारोपण राबवित आगळावेगळा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.
पाथर्डी प्रतिनिधी : तालुक्यातील गितेवाडी गावचे सुपुत्र लक्ष्मण गिते यांनी ३५ वर्षे आयकर विभागात कार्यरत होते. गितेवाडी ग्रामपंचायत व जय हिंद सैनिक फौंडेशनच्या वतीने सेवापुर्ती गौरव सोहळा करण्यात आला. सेवा निवृतीच्या निमित्ताने हनुमान मंदीर व राधाकृष्ण मंदीरात पुजा करून ३० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. आठ वड, आठ पिपंळ, आठ लिंब व ६ कदंब एकुण ३० झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी  जय हिंदचे शिवाजी पालवे बोलताना म्हणाले की, लक्ष्मण गिते यांचा आदर्श महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा.त्यांनी आयकर विभागात चांगले कार्य केले आहे. यावेळी ऍड संदिप जावळे, शिवाजी गर्जे, पद्माकर आव्हाड, घनश्याम आव्हाड, निवृत पोलिस अधिकारी शंकर डमाळे, कोल्हारचे सरपंच शिवाजी पालवे, सौ विजया गर्जे, गितेवाडीचे पालवे, सरपंच भाऊसाहेब पोटे विष्णु गिते बाबासाहेब गिते सर डाॅ सुधाकर गिते, वैभव गिते, अशोक गिते, महादेव गिते, डाॅ रामेश्वर गिते, उपसरपंच राजु गिते, अशोक गितेे, आडसुळ सर, आंधळे सर, गर्जे पाटील आदी उपस्थित होते. गा‌वाच्या वतिने हा सोहळा करण्यात आला. आभार लक्ष्मण गिते यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button