अहमदनगर

शंभुक वसतीगृहात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – येथील बहूजन शिक्षण संस्थेच्या शंभूक विद्यार्थी वसतीगृहामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहन श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी मुख्याध्यापक तथा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक नवनाथ अकोलकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार मिलिंदकुमार साळवे, नगरसेवक दिपक चव्हाण, महाराष्ट्र बँकेचे माजी मॅनेजर खंडिझोड, राजेंद्र शेळके, रामभाऊ सुगूर, रूपटक्के, अरुण मंडलिक, ह.भ.प निलेश महाराज, राहूल भोसले, प्रविण साळवे, संतोष मोकळ, शाहीर दगडू नरवडे, सौ.दिवेताई भिम आर्मी पदाधिकारी, यशवंत नागरी पतसंस्था श्रीरामपूर पदाधिकारी, व कर्मचारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्यांना नवनाथ अकोलकर व प्रविण साळवे यांनी पारितोषिक दिले. नवनाथ अकोलकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा इतिहास समजावून सांगितला. शाहीर नरवडे यांनी स्वातंत्र्यावर आधारीत गीते सादर केली. यशवंत नागरी पतसंस्था व राहूल भोसले मित्रमंडळाच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभुक विद्यार्थी वसतीगृहाचे अधिक्षक अशोक दिवे यांनी केले तर आभार सिध्दार्थ दिवे यांनी मानले.

Related Articles

Back to top button