सामाजिक

ग्रामस्थांची कोविड सेंटर उभारणीची पूर्वतयारी

व्हिडिओ : कोविड सेंटर उभारणीची पूर्वतयारी
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील मानोरी येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामस्थांनी कंबर कसून कोविड सेंटर उभारणीची पूर्वतयारी सुरु केली आहे.
      दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड सेंटर उभारणीसाठी शाळा परिसर स्वच्छ केला आहे. विलगीकरण कक्षाची क्षमता २० बेडची असुन पिण्याच्या पाण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटर ला तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याकामी डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, सरपंच आब्बासभाई शेख, शिवाजी थोरात, आण्णासाहेब तोडमल, शामराव आढाव, मनोज खुळे, पोपट पोटे, दिलावर पठाण, मनोज ठुबे, आण्णासाहेब ठुबे, रणजित आढाव, उध्दव पिले, गोरक्षनाथ गुंड, मुख्यध्यापक संजय पाखरे, राजु जगधने आदींचे सहकार्य लाभत आहे. या कोविड सेंटरच्या उभारणीमुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येला नक्कीच आळा बसणार असल्याचा विश्वास येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button