महाराष्ट्र

क्रांतिदिनी शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन

शिक्षण उपसंचालक पुणे व शिक्षणाधिकारी अहमदनगर यांच्यामार्फत शिक्षण मंत्र्यांना पत्र


राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील, राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष आर.बी.पाटील, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, राज्य सचिव सुनील गाडगे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, माध्यमिकचे सरचिटणीस विजय कराळे, योगेश हराळे, संतोष देशमुख, ज्युनियर कॉलेज युनिटचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती दिनाच्या दिवशी होणारे एक दिवसीय देशव्यापी आंदोलन शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी जुनी पेन्शन योजना विद्यार्थी शिक्षक व जनता विरोधी नवे शैक्षणिक धोरण रद्द करण्यासाठी अशा विविध मागण्यांसाठी अहमदनगर शिक्षक भारतीचे व कनिष्ठ महाविद्यालय युनिटचे सर्व पदाधिकारी यांनी पुणे,अहमदनगर व सर्व तालुक्यांमध्ये कोविड 19 चे नियम पाळून धरणे आंदोलन केले व शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले पुणे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत निवेदन दिले. त्यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्रलंबित प्रश्न लवकर सोडविण्याचे आश्वासन उपसंचालक यांनी दिले. तसेच नाशिक विभागीय पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शिक्षणाधिकारी अहमदनगर व वेतन अधीक्षक यांच्यासमवेत अनेक प्रश्न समजून घेऊन शिक्षणाधिकारी कार्यालय पातळीवरील प्रश्न सोडविणार असेच आश्वासन दिले.
    क्रांती दिनाच्या दिवशी देशभरातील शेतकरी संघटना, कामगार संघटना, प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील विविध शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी एकदिवसीय देशव्यापी आंदोलन करणार केले. शिक्षण बचाव मंच अंतर्गत झालेल्या विविध संघटनांच्या बैठकीत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, जुनी पेन्शन योजना, विद्यार्थी शिक्षक व जनता विरोधी नवे शैक्षणिक धोरण रद्द करा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रती विद्यार्थी रु २००० नेटपॅक भत्ता आणि मोफत मोबाईल अथवा टॅब द्या, अनुसूचित जाती जमाती व गरीब विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक शैक्षणिक पॅकेज घोषित करा इत्यादी मागण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  आज अहमदनगर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शांततेत कोवीडचे नियम पाळून आंदोलन केले. शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे शिक्षणाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे धरणे आंदोलन केले. आंदोलनासाठी जिल्ह्यातून प्रत्येक तालुका अध्यक्ष व पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होते.
        शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षक यांच्यासमोर विविध प्रश्न मांडले. राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सरचिटणीस विजय कराळे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली योगेश हराळे, संतोष देशमुख, अशोक अन्हाड, शेवगाव तालुका अध्यक्ष  कैलास जाधव यांनी आंदोलनाचे यशस्वी नियोजन केले.  धरणे आंदोलनाच्या आयोजनात जितेंद्र आरु, सुदाम दिघे, शरद कारंडे, मोहम्मद समी शेख, नवनाथ घोरपडे,  संतोष शेंदुरकर, सिकंदर शेख यांनी सक्रिय सहभाग घेतला. पेन्शन योजना का❓ कशासाठी लागू करावी याबाबत पोटतिडकीने मुकुंद आंचवले नानासाहेब काटे संजय भुसारी यांनी आक्रमक होत आपले विचार मांडले. सोमनाथ बोंतले, दत्तात्रय घुले, अर्जुन घुगे यांनी वरीष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, मेडिकल बिले यासंदर्भात प्रश्न मांडले. ते लवकरात लवकर सोडवण्याचा आग्रह धरला. शिक्षकेतर कर्मचारी वरीष्ठ वेतन श्रेणी सहा वर्षे पासून जो शिक्षण विभागाने घोळ घातला त्या संदर्भात नंदकुमार कुरुमकर, नंदकुमार नागवडे, दत्तात्रय आगवणे यांनी निवेदन दिले. कारभारी आवारी, एकनाथ चंदनशिवे, पोपटराव औटी, नजीबखान यांनी शिक्षक शिक्षकेतर यांना कोवीड ड्युटीतुन वगळावे तसेच ऑनलाईन शैक्षणिक कामकाजामध्ये पुरेसा वेळ देण्यासाठी इतर शैक्षणिक कामकाजातुन वगळावे ही मागणी केली. घालमे सर ,इम्रान खान,सागर बनसोडे,खान मुनव्वर हुसेन,आव्हाड सर यासह असंख्य सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक भारती संघटना विनाअनुदानित धोरण विरोधी संघर्ष समिती च्या राज्य अध्यक्षा रुपालीताई कुरुमकर, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती श्रीगोंदा तालुका अध्यक्षा रुपालीताई बोरुडे यांनी महिला शिक्षकांचे प्रश्न मांडले व शालार्थ आय.डी.बाबत आक्रमक भूमिका घेतली अशाप्रकारे आज अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक भारती संघटनेने यशस्वी धरणे आंदोलन केले. पुणे येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे, सुरेश क्षीरसागर, प्रताप येळवंडे, प्रवीण बेळगे, बबन भोसले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे आदी पदाधिकारी यांनी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले. तसेच अकोले शिक्षक भारती संघटनेचे संजय पवार, सुरज गायकवाड, निशांत बिबवे, वाकळे सर, विठ्ठल पटेकर, सुदर्शन ढगे आदी पदाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी अकोले यांना निवेदन दिले. अहमदनगर जिल्ह्यातून महेश पाडेकर, किशोर डोंगरे, अमोल वर्पे, गजेंद्र कर्डीले यांच्या सहीत शिक्षक भारती संघटनेचे तमाम सदस्य पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शवला.
अहमदनगर शिक्षक भारती संघटनेचे कार्य अतिशय उल्लेखनिय आहे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न प्रभावी पने  मांडून सोडवण्याचे काम संघटना करते. शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि आज क्रांतिदिनी होणाऱ्या शिक्षक भारती संघटनेच्या देशव्यापी आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे  

आ.डॉ.सुधीर तांबे
पदवीधर आमदार नाशिक विभाग

Related Articles

Back to top button