सामाजिक

शहरातील खड्ड्यांना हार घालून क्रांतीसेनेची गांधीगिरी

परभणी : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्डे दुरूस्तीसाठी महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांना हार घालून अखिल भारतीय क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदराज इक्कर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.
      संपूर्ण शहरात खड्डे ईतके आहेत की मोजता येणार नाही.यातुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या या अनोख्या आंदोलनामुळे तरी महानगरपालिकेकडून खड्डेमुक्त परभणी साठी काही ठोस पावले उचलली जातील व रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील भजन गल्ली सुभाष रोड परभणी या रस्त्यावरील खड्ड्यांना हार घालण्यात आले.यावेळी गोविंदराज इक्कर पाटील, आशिष राऊत, शरद आभुरे, महेश तिवारी, सचिन नखाते, शिवाजी माने, आरिफ पठाण, पवन ठाकूर, दत्ता सावंत, राजेश सुपेकर, महेश जोधले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

   

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button