ठळक बातम्या

शासनाने खाजगी कोविड केंद्रांना परवानग्या देवून गरिबांचे खिसे कापले – आ. राधाकृष्ण विखे पा.

चिंचोली/बाळकृष्ण भोसले: आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य केंद्र सरकारवर टिका करुन आपली कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्यापेक्षा लोकांच्या कामावर लक्ष द्यावे. कोरोना काळात खाजगी कोविड केंद्रांना परवानग्या देवून गरिब जनतेचे खिसे कापल्याचे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.


कोल्हार खुर्द येथे ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दत्ता पाटील होते. प्रास्ताविक सरपंच प्रकाश पाटील यांनी केले. विखे पाटील पुढे म्हणाले की केंद्र सरकारकडे बोट दाखवणारे राज्य सरकार कोविड काळात काय फक्त झोपा काढत होते का असा सवाल करत कोविड काळात काम करण्याऐवजी मंत्री मुंबईत जाऊन बसले होते. या काळात आपल्या चेल्यांचे खिसे भरण्यासाठी सर्रासपणे खाजगी कोविड केंद्राला परवानग्या देऊन गरीब जनतेचे खिसे कापले. लसीचा खर्च केंद्र सरकारने करायचा आणि राज्यशासनाने फलकांवर आपले फोटो लावायचे.

परमिटरूम व बियरबर चालू केले परंतु मंदिरे अद्याप बंदच कारण परमिटरूम व बारच्या पैशावर यांचा डोळा होता. परंतु तीर्थक्षेत्र बंद असल्याने किती कुटुंबे उध्वस्त झाली याचा विचार कोण करणार असेही विखे पाटील म्हणाले. याठिकाणी कठीण काळात ग्रामपंचायतने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले आभार प्रदर्शन दीपक पाटील यांनी केले.

कोल्हार येथील मागील आठवड्यात घडलेल्या घटनेबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, ही घटना निंदनीय असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्ती ठेचून त्यांना मोका लावला पाहिजे. कोल्हार येथील घटनेत बाहेरील काही हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या संघटनांनी घुसखोरी करून आगीत तेल ओतण्याचे काम केले असे प्रकार वेळीच थांबवले पाहिजे व सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक हित जोपासले पाहिजे.

Related Articles

Back to top button