अहमदनगर

श्रीरामपूर साहित्यिकांतर्फे झालेला सन्मान मला साहित्यानंद देणारा – नगराध्यक्षा अनुराधा आदिक

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : श्रीरामपुरातील साहित्यकांनी माझा केलेला सन्मान मला खरा साहित्यानंद देणारा असल्याचे मत श्रीरामपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी व्यक्त केले.

वाचन संस्कृती प्रतिष्ठान, साहित्य प्रबोधन मंच, साहित्य परिवार ग्रुप, स्नेहप्रकाश प्रकाशन, राज माइंड पावर पब्लिकेशन इत्यादी साहित्यिक आणि ग्रन्थ प्रकाशन संस्थेचे पदाधिकारी, सदस्यांनी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचा साहित्यिक, समाजसेवी व्यक्तिमत्व असलेल्या लोकांची दखल घेऊन त्यांना “श्रीरामपूर भूषण पुरस्कार ” देऊन योग्य गौरव केला. त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. सौ. स्नेहलता कुलथे यांच्या हस्ते अनुराधा आदिक यांना बुके देण्यात आला. यावेळी सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. उज्जवला जगताप, सौ.श्रद्धा कुलथे, सौ.संगीता कटारे, डॉ.रामकृष्ण जगताप, पत्रकार प्रकाश कुलथे, डॉ. बाबुराव उपाध्ये, स्वामीराज कुलथे, नगरसेविका सौ. अर्चनाताई पानसरे आदी उपस्थित होते.

संगीता फासाटे,कटारे यांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची श्रीसाई संस्थांच्या मंडळावर निवड झाल्याबद्दल अशोकराव कटारे, संगीता कटारे परिवारातर्फे सत्कार करण्यात आला तर डॉ. बाबुराव उपाध्ये यांना श्रीरामपूर भूषण पुरस्कार लाभल्याबद्दल कटारे परिवारातर्फे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दैनिक स्नेहप्रकाश सुरु केल्याबद्दल कटारे परिवारातर्फे संपादक पत्रकार प्रकाश कुलथे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.उपाध्ये, पत्रकार कुलथे, लबडेसर यांनी मनोगत व्यक्त केले. सिद्धेश अशोकराव कटारे यास फेटा बांधून बुके देऊन त्यांच्या गुणवत्तेबद्दल डॉ.रामकृष्ण जगताप आणि सौ. उज्जवला जगताप यांनी सत्कार केला. अशोकराव कटारे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button