ठळक बातम्या

राहाता तालुक्यातील शेतकरी काढणार ११ नोव्हेंबरला तहसिलवर बिऱ्हाड मोर्चा

राहाता : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान होवुन दोन महिने उलटूनही घोषणे प्रमाणे शासनाकडुन शेतकऱ्यांना अजुनही एक दमडीची मदत मिळाली नाही, तसेच पिक विमा कंपनीनेही अल्प मोबदला देवुन शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. दिवाळीला मदत देऊ अशी शासनाची घोषणा होती. अद्यापही मदत मिळाली नाही. ही मदत तातडीने द्या अन्यथा येत्या ११ नोव्हेंबरला राहाता तहसिलवर महिला व शेतकऱ्यांचा पशुधनासह बिऱ्हाड मोर्चा काढण्याचे निवेदन लोणी खुर्द च्या कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राहाता तहसिलदारांना दिले आहे.
राहाता तालुक्यातील सर्वच परीसरात दोन महिन्यात दोनदा अतिवृष्टी झाली. खरीप पिकांचे प्रंचड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन दिवाळी सनाच्या अगोदर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देवुन त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणाही सरकार कडुन करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अजुन एकाही शेतकऱ्यानां मदत मिळाली नसल्याने त्यांना आर्थीक संकटात दिवाळी साजरी करावी लागली. रब्बी हंगाम सुरु झाला असुन शेतकऱ्यांना पुन्हा शेतात पिके उभे करायची आहे. अतिवृष्टीने पिके वाया गेल्याने खरिपाचे कर्ज डोक्यावर तसेच आहे. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा होत असल्याने शेतकऱ्यांमधुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाने दोन महिन्यापासून सुरु केलेला कागदीघोडे नाचण्याचा प्रकार बंद करून तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच पिक विमा कंपन्यांनी विम्याचे मोठे हप्ते घेवुन मोजक्याच शेतकऱ्यांना नाममात्र परतावे दिले तर मोठ्या प्रमाणात शेतकरी परताव्यांपासुन वंचित आहेत. हे परतावे नुकसानीच्या प्रमाणात मिळावेत तसेच अतिवृष्टीने वाहुन गेलेले शिवार वाहतुकीचे रस्ते प्रशासनाने तातडीने दुरूस्त करावे अन्यथा शुक्रवारी ११ नोव्हेंबरला राहाता तहसिलवर शेतकरी, महिला त्यांच्या लेकराबाळांसह व पशुधनासह बिऱ्हाड मोर्चा काढणार असल्याचे निवेदन राहात्याचे तहासिलदार कुंदन हिरे यांना लोणी खुर्दच्या ग्रां.पं.सदस्या कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिले.
यावेळी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, साई संस्थानचे माजी विश्वस्त डाॅ.एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, विक्रांत दंडवते, राजेंद्र आहेर, रणजित आहेर प्रसाद आहेर, नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, भुमीपुत्र शेतकरी संघटनेचे राधुजी राऊत, राजेंद्र निर्मळ, वर्षा घोगरे, शांता आहेर, सुनीता कोरडे, कृष्णाबाई तुपे, सविता घोगरे, अर्चना आहेर, सुजाता आहेर, लता मापारी, दिलीप आहेर, विलास घोगरे, शंकर राऊत, आण्णा तुपे, विनायक घोगरे, वसंत घोगरे, एकनाथ आहेर, बाबासाहेब मापारी, विशाल आहेर, अशोक आहेर, महेश आहेर, राहुल घोगरे, विठ्ठलराव शेळके, दिनेश शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला तसेच मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता.

Related Articles

Back to top button