महाराष्ट्र

मराठी चित्रपट निर्मात्यांच्या समस्या सोडविण्याची काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी

निर्माता आणि चित्रपट व्यावसायिकांनी समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांची घेतली भेट…

अहमदनगर / जावेद शेख : कोरोना प्रादुर्भावानंतर सर्वच क्षेत्रातील कामकाज सुरळीत होत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई ही कला सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भूमि आहे. परंतु मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीला महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही सहकार्य झालेले नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने निर्माता आणि चित्रपट व्यावसायिकांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवन दादर, पश्चिम मुंबई येथे निवेदन दिले आहे.
निर्माता आणि चित्रपट व्यावसायिकांनी नाना पटोले व ना. अमित देशमुख यांच्याशी चर्चा केली. यावेळी  महाराष्ट्र शासनाकडून कलाकारांचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. यात चार वर्षांपासून प्रलंबित चितपटांचे अनुदान देणे, मल्टिप्लेक्स चित्रपट गृहातील काही नियम, डिजिटल प्लॅटफॉर्म इ. महाराष्ट्र शासनाच्या बिगर शासकीय सदस्य सांस्कृतिक समितीमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची नियुक्ती व्हावी, तसेच सभासदांना अनुदान मिळावे, पु.ल.देशपांडे कला अकादमी येथे ऑफिस साठी जागा मिळावी, डबिंग बंद करावे, चित्रपट कलाकारांची नोंदणी, मराठी सिंगल स्क्रिन चित्रपट गृहांना सवलत द्यावी, अश्या अनेक मागण्यांसाठी नाना पटोले व महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ना. अमितजी देशमुख यांना निवेदन देत चर्चा केली आहे. यावेळी निर्माता आणि चित्रपट व्यावसायिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांस्कृतिक मंत्री ना. अमित देशमुख यांना सांगितले आहे.
या अर्जावर संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मोरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ अध्यक्ष महाराष्ट्र निर्माता प्रोडूसर बाळासाहेब गोरे, महिला अध्यक्षा तजेला बगाडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय शिंदे, राज्य संघटक अशोक सुर्यवंशी, गिरीष राणे, राजेद्र बोराडे, विजयभाऊ पाटिल, विजय राणे, राजु शेवाळे, रमेश झेंडे, ज्योति निसल, अशोक सवने, शितल कांबळे, रंगराव कोटकर, गजानन हेंद्रे, अडव्होकेट मनीष व्हटकर, मनिष व्हटकर, अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनील ज्ञानदेव भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button