निधन वार्ता

खोसपुरी येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय हारेर यांचे दुःखद निधन

राहुरी : नगर तालुक्यातील खोसपुरी या गावातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय राजाराम हारेर यांचे शुक्रवार, दि. 1 डिसेंबर 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने खोसपूरी गावात तसेच तमाम लोहार समाजात शोककळा पसरली आहे. त्यांचा दशक्रियाविधी रविवार दि. 10 डिसेंबर 2023 रोजी पांढरी पुल येथे होणार आहे. त्याप्रसंगी ह.भ.प. पोपट महाराज वांबोरीकर यांचे प्रवचन होईल.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button