ज्येष्ठ पत्रकार विजय येवले यांचे हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून एक आगळा वेगळा ठसा उमटवणारे निर्भीड पत्रकार विजय बापुसाहेब येवले यांचे आज सकाळी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विजय बापुसाहेब येवले, वय ४९ वर्षे, रा. तनपूरे गल्ली, राहुरी यांना आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे छातीत त्रास होऊ लागल्याने अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांना हदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले.
विजय येवले हे मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीचे कर्मचारी होते. दरम्यान त्यांनी पत्रकारिता सुरू केली. अनेक वर्तमान पत्राचे काम केल्यानंतर त्यांनी अग्निगोल नावाचे स्वतःचे साप्ताहिक सुरू केले. त्या माध्यमातून त्यांनी गोर गरीब व वंचित लोकांना न्याय देण्याचे काम केले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहिण, एक मुलगी, एक मुलगा, जावई असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.