निधन वार्ता

अशोक गुंजाळ यांनी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

अशोक मंडलिक | राहुरी : येथील बांधकाम ठेकेदार अशोक गुंजाळ यांचा अपघात होऊन आज दि. १ एप्रिल २०२४ रोजी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. 

अशोक मारुती गुंजाळ, वय ५४ वर्षे, राहणार लोहार गल्ली, राहुरी. हे बांधकाम ठेकेदार होते. दि. २७ मार्च २०२४ रोजी ते त्यांच्या मोटारसायकलवर एकटेच अहमदनगर येथे कामा निमित्त गेले होते. रात्री ९ वाजे दरम्यान ते अहमदनगर येथून राहुरीकडे येत असताना डॅम फाटा येथे त्यांच्या मोटारसायकला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती. त्यावेळी अशोक गुंजाळ यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. डाॅक्टरांनी त्यांना वाचवविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र आज दि. १ एप्रिल २०२४ रोजी दु. ३ वा. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशोक मारुती गुंजाळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे, तीन भाऊ, आई, वडील असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button