राजकीय

उंदीरगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा शुभारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदीरगाव ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला व लोकसेवा मंडळाचे लोकनेते भानुदास मुरकुटे गटाचे सुरेश पा.गलांडे, वीरेश पा. गलांडे यांच्या नेतृत्वाखालील उंदीरगाव ग्रामपंचायत उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीफळ सुरेश पा.गलांडे, वीरेश पा.गलांडे, सुभाष पंडित, राजेंद्र नाईक, लक्ष्मण सरोदे, भिमभाऊ बांद्रे, बाळासाहेब नाईक, सोपानराव नाईक, अहमदभाई इनामदार यांच्या हस्ते फोडून शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला.

उंदीरगाव सरपंचपदासाठी प्रतिभा जितेंद्र गोलवड ह्या उमेदवार असून प्रभाग १ मघ्ये अनु. जाती महिला- ताईबाई दामोधर आव्हाड, प्रभाग २ अनु. जाती महिला- उषा दीपक बोधक, अनु. जाती महिला- सुनिता लहू बर्डे, सर्वसाधारण- सचिन लक्ष्मण गायकवाड, प्रभाग ३ अनु. जाती महिला- लीलाबाई दिनकर आव्हाड, सर्वसाधारण महिला- माधुरी नवनाथ नाईक, सर्वसाधारण- बाळासाहेब रघुनाथ निपुंगे, प्रभाग ४ सर्वसाधारण महिला- दिपाली योगेश सरोदे, सुनिता रामचंद्र आव्हाड, सर्वसाधारण- सुधीर नानासाहेब ताके, प्रभाग ५ अनु जाती- लक्ष्मण बाळासाहेब रगडे, ना.मा.प्रवर्ग- ज्ञानेश्वर रमेश बांद्रे, सर्व साधारण- शेख अलमनुर अब्बास, प्रभाग ६ अनु जाती- कोमल राजेश दोंदे, अनु जमाती- किशोर नारायण बर्डे, सर्व साधारण महिला- वर्षा अशोक भालदंड असे उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

त्याचप्रमाणे अग्निपंख सर्वसामान्य जनता आघाडीच्या गटामध्ये स्वप्नील पंडित यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदासाठी अंकुश फकीरा बर्डे यांचा अर्ज दाखल केला आहे. प्रभाग १ साठी सपना स्वप्नील पंडित, प्रभाग १ साठी- गिरीश लक्ष्मण परदेशी, प्रभाग २ साठी- स्वप्नील नागेश पंडित, नंदा रमेश पंडित, प्रभाग ६- वंदना सुनील साठे, अंकुश फकीरा बर्डे असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही गटाचा प्रचार शुभारंभ झाला आहे. आता सर्वांचे लक्ष ५ नोव्हेंबरच्या मतदान दिनाकडे लागले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button