अहमदनगर

मध्य रेल्वेने नोटीसा दिलेल्या जागेची मालकी सिद्ध करावी – शेतकरी संघटनेचे ॲड. काळे यांचे आवाहन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शहरातील रेल्वेच्या सव्वा दोनशे फूट हद्दीत शंभर वर्षांपासून स्वतःच्या मालकीहक्काच्या जागेत वास्तव्य असलेल्या शहरी नागरिकांना अतिक्रमणाच्या नोटिसा पाठवल्या. सदर नोटिसेमुळे नोटीसधारक नागरिकांनी जय मातादी मंगल कार्यालय गोंधवणी येथे मेळावा आयोजित केला होता. सदर मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात एडवोकेट अजित काळे म्हणाले की, नोटीस दिलेल्या जागेतील सोलापूर मध्य रेल्वेने आपली मालकी सिद्ध करावी. रेल्वेकडे माझ्या माहितीप्रमाणे नोटीसा दिलेल्या जागेचे मालकी हक्क असलेले कोणतेही पेपर नाहीत असे रेल्वेने दिलेल्या नोटिसीवरून मी आपल्याला ठाम सांगतो.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप, खिर्डीचे सरपंच प्रभाकर कांबळे, उच्च न्यायालयाचे विधी तज्ञ ॲड. तलवार, नगरपालिकेचे नगरसेवक अंजूमभाई शेख, रवींद्र गुलाटी, राजेश अलग, नागेश सावंत, ॲड. सर्जेराव घोडे, ॲड. बोर्डे, प्रकाश चित्ते आदिंसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. सदर दिलेल्या नोटिसीच्या अनुषंगाने ॲड. अजित काळे यांनी संबंधित अतिक्रमण धारक नोटीस पाठवलेल्या नागरिकांना संबोधित केले.

यावेळी ते पुढे म्हणाले की, मध्य रेल्वेने दिलेली नोटीसमध्ये कोणत्या जागेत काय अतिक्रमण केले याबाबतचा खुलासा केलेला नाही. तसेच नोटीस आलेल्या प्रत्येक रहिवासी नागरिकांनी याबाबतचे सविस्तर उत्तर मध्य रेल्वे ला देण्याचे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे यासाठी आपल्याला जिल्हा सत्र न्यायालय श्रीरामपूर येथे मध्य रेल्वेच्या विरोधात मनाई हुकूम घ्यावा लागेल व वेळप्रसंगी मी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे श्रीरामपूरकरांसाठी मोफत वकिली करून आपल्याला शंभर टक्के न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावीन असेही ॲड. काळे म्हणाले.

तरी याबाबत आपल्याला सर्वपक्षीय एक जनआंदोलन उभे करावे लागेल. शेतकरी संघटना माझ्यासह आपल्या सोबत असेल. तसेच याबाबत आपण खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून केंद्राकडे हा प्रश्न सोडवून घेणेसाठी प्रयत्न केल्यास ते अधिक सोयीस्कर होईल अन्यथा आपण उच्च न्यायालय औरंगाबाद येथून न्याय मिळवून देऊच अशी ग्वाहीही त्यांनी उपस्थितांना देऊन आश्वासित केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button