अहमदनगर

निळवंडेचे खुले कालवे व खुल्या चाऱ्या लाभक्षेत्रासाठी वरदान – विलास गुळवे

मंत्री नामदार नितीन गडकरी यांचा निळवंडे कालवे व चाऱ्या खुल्या करण्याची यापूर्वीच लोकसभेत घोषणा

गोगलगाव – बंदिस्त कालव्यांना निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी कधीही समर्थन देणार नाही कालवे व चाऱ्या बंदिस्त होण्याकरिता लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी पन्नास वर्ष संघर्ष केलेला नाही. तेव्हा आता लाभक्षेत्रात संभ्रम निर्माण करु नका. निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात येऊ घातले आहे, अशात काही लोकांकडून बंदिस्त पृच्छ कालवे व चाऱ्यांचे समर्थन केले जात आहे. हे लाभक्षेत्राच्या दृष्टीने घातक असून त्यामुळे लाभक्षेत्र उजाड होण्याची शक्यता असल्याची भीती निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी विलास गुळवे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे व्यक्त केली.

निळवंडेचे पाणी लाभक्षेत्रात जिरले पाहीजे. पाणी जिरणे म्हणजे पाण्याचा अपव्यय हा एक जावई शोध लावला आहे. देशाचे तत्कालीन जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी निळवंडे कालवे व चाऱ्या याबाबत लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर निळवंडे कालवे व चाऱ्या बंदिस्त नसुन ओपन राहणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळेच आज निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी झाली आहे.

धरणाच्या आठ टिमसीवर ६८ हजार हेक्टर क्षेत्र भिजवणे शक्य आहे. त्यानुसार आता घाट माथ्यावरील वाहुन जाणारे पाणी आडवल्याने पाणी वाढणार आहे. त्यादृष्टीनेच खा. लोखंडे प्रयत्नशील आहे. केंद्रीय जल आयोगाने हे क्षेत्र कमी करण्याची सुचना जलसंपदा विभागाला केली होती. त्यानुसार पृच्छ भागाचे क्षेत्र सर्वच कमी होत होते, त्याचा सर्वात मोठा फटका हा आवर्षण प्रवण क्षेत्रालाच बसत होता. हा अन्याय होऊ नये म्हणुनचं खा. लोखंडे यांनी महाराष्ट्र सरकार कडुन घाट माथ्यावरील पाणी अडवून पाणी वाढवले जाणार आहे.

यासाठी कोणतेही क्षेत्र कमी न करता आम्ही हे क्षेत्र ओपन सिंचनाद्वारे भिजवू अशी कोणतीही पाण्याची अडचण राहणार नाही. प्रवाही सिंचनात पाण्याचे अनेक टप्प्यावर लाभ होतो. जमिनीमध्ये पाणी पातळीची वाढ होते. लाभक्षेत्रातील शेतकरी पन्नास वर्षापासून बंदिस्त पाईपलाईनची वाट पाहत नव्हते. तेव्हा निळवंडेचे कालवे व चाऱ्या खुल्या पाहीजे बंदिस्त कालवे व बंदिस्त चाऱ्याच्या नावाखाली शेतकर्‍यांना अजुन किती काळ पाण्यावाचून वंचित ठेवता असा थेट प्रश्न शेतकरी विलास गुळवे यांनी केला.

निळवंडे धरण ही काय कुणाची वडिलोपार्जित शेतजमीन नाही. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी आंदोलने व उपोषणे करण्याचा प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे. त्यामुळेच व्यक्तीद्वेशातुन एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना न्याय कसा मिळेल यासाठी कार्य केले जावे, अशी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची इच्छा आहे.

श्री विलास रंगनाथ गुळवे; शेतकरी निळवंडे लाभक्षेत्र.

 

 

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button