अहमदनगर

प्रकाश ढोकणे यांच्या रुपात विकास कामांना प्राधान्य देणारा नेता मिळाला

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शहरातील प्रभाग क्र. ४ चे माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी रात्री अपरात्री या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जाऊन प्रश्न मार्गी लावलेत. या भागाचे कार्यतत्पर, नेहमी मदतीला धावून जाणारे या प्रभागाचे मा.नगरसेवक ढोकणे यांनी आपल्या भागातील जवळ जवळ ८० ते ९० % रस्ते कॉक्रीटीकरण व डांबरीकरण करुन नागरिकांना चिखलातून रस्ता काढत जावे लागत होते ते कायमस्वरूपी बंद केले.

नगरपालिकेच्या पाण्याचे असो, कचरा वाहतूक गाडी असो की गटारी स्वच्छता, भागातील स्ट्रीट लाईट असो अशी अनेक कामे एका फोनवर किंवा एका मेसेजवर ताबडतोब पूर्ण करणारे, प्रसिद्धी व हार, तुरे याची अपेक्षा न करता आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणारे त्यांचा कार्यकाल संपलेला असतानाही नागरिकांच्या सतत संपर्कात असणारे माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी बोरावकेनगर मधील पिण्याच्या पाण्याची नवीन एसी जलवाहिनी व दोन्ही बाजूचे काँक्रीटीकरण चे दर्जेदार रस्ते करून दिल्याबद्दल त्यांचा कॉलनीच्या वतीने सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन त्यांच्या कामाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सुरेश कोळगे म्हणाले की, अशा सर्वसामान्य व सर्वांच्या उपयोगी पडणाऱ्या नगरसेवकांस पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्यास आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. त्याप्रसंगी अधिक जोशी, दिपक कदम, संजय जोर्वेकर, सुरेश कोळगे, सय्यद, करवर, भोये, संतोष रासकर, सोमा सोनवणे, साळवे व बोरावके नगर मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button