अहमदनगर

केंद्र व राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

खुडसरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांची मागणी

आरडगांव | राजेंद्र आढाव : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला असल्याने त्यांची परिस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने त्वरित सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असा ठराव खुडसरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील स्वर्गीय नानासाहेब पवार यांच्या तत्त्वानुसार सुरू असलेली खुडसरगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात पार पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2023 या वर्षी जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील शेतकऱ्यांची बाजरी, सोयाबीन, कापूस, कांदा, मका, ऊस या सारखी उभी पिके पावसाअभावी करपून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पन्नात घट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सोसायटी व बँकेमार्फत घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी करावी असा ठराव करण्यात आला आहे.

यावेळी रामेश्वर पवार, ज्ञानेश्वर पवार, भोलेनाथ पवार, आदिनाथ पवार, गणेश पवार, सुभाष पवार, आप्पासाहेब पवार, भाऊसाहेब देठे, भाऊसाहेब पवार, मच्छिंद्र निशाणे, आबासाहेब पवार, ज्ञानेश्वर निशाणे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब देठे, नानासाहेब पवार, हरिभाऊ पवार, संदीप पवार, सचिन पवार, दादासाहेब पवार, सतीश पवार, प्रवीण पवार, राजेंद्र क्षीरसागर, डॉ. सुभाष पवार, प्रमोद पवार, प्रमोद पवार, काकासाहेब पवार, हरिभाऊ पवार, सुभाष देठे, सोमनाथ देठे, सचिव चव्हाण भाऊसाहेब आदींसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button